Dancing to joy

VitB12 / B6 / फॉलिक ऍसिड गुणकारी जीवनसत्त्व

             Vit B12 /B6/ Folic Acid  गुणकारी  जीवनसत्व 

Vit B12 ( मिथील कोबालामाईन ) ,Vit B6 (पायरिडॉक्सिन ), Folic Acid(फोलिक आम्ल ) ही  अतिशय 
महत्त्वाची जीवनसत्वे आहेत . अगदी हृदयाजवळची म्हणायला हरकत नाही . कारण यांच्या कमतरतेचा 
परिणाम सरळ हृदय -रक्तवाहिण्या -मेंदु व संवेदना वाहणाऱ्या नसा आणि हाडांवर होत असतो . तो कसा ते आपण आता पाहू . . .  
Vit B12 हे अतिशय महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे . त्यातील कोबाल्ट या धातूमुळे त्यास कोबालामाईन असेही 
संबोधले जाते .
आपल्या शरीरात खालील कारणांसाठी Vit B12/Vit B6/Folic Acid ची  गरज असते .
  • मायलिन शीथ (Nerve Sheet) नसावरील आवरण तयार करण्यासाठी 
  • नसेमधील पेशी (Nerve Cell)तयार करण्यासाठी 
  • रक्तामधील पेशी (RBC)तयार करण्यासाठी 
  • DNA तयार करण्यासाठी 
  • रक्तातील होमोसिस्टीन चे प्रमाण Vit B6 आणि Folic Acid च्या  मदतीने कमी करण्यासाठी 
  • हाडे तयार करण्यासाठी /हाडांच्या मजबुतीसाठी 
  • न्युरोट्रान्समिटर (मेंदुतील केमिकल किंवा रसायन) बनवण्यासाठी 
  • प्रोटीन तयार करण्यासाठी व शरीरातील फॅट ,कार्बोहायड्रेटच्या निर्मितीसाठी व  विघटनासाठी याचा उपयोग होतो .   
Vit B12च्या कमतरतेची कारणे :-
  • मागणी तेवढा पुरवठा नाही. 
  • पोटातुन ते योग्य प्रमाणात शोषुन घेतले जात नाही.
  • शाकाहारी जेवण . 
  • अति ताणतणाव (Vit B12 and stress are in inverse proportion)
  • इतर औषधांबरोबर संयोग झाल्यामुळे 
  • पित्तनाशके (Antacid) जठरातील PH चे प्रमाण कमी करते,त्यामुळे Vit B12शोषून घेण्याची जठराची क्षमता कमी होते. 
परिणाम :-
  • DNA ची निर्मिती व्यवस्थित होत नाही.
  • रक्ताचे प्रमाण कमी होते (मेगालोब्लास्टीक ऍनिमिया).
  • भारतातील प्रत्येक ५ स्रीयांमागे तिसरी स्री ही ऍनिमिक आहे. मग ती श्रीमंत असो वा गरीब. 
  • मायलीन शितची निर्मिती न झाल्यामुळे संवेदना वाहून नेणाऱ्या नसांना इजा पोहचते .त्यामुळे मुंग्या येणे, हातापायाला जळजळ किंवा भडका उडाल्यासारखे वाटणे. 
  • होमोसिस्टीनचे प्रमाण वाढते .त्यामुळे हृदयरोग व हाडांचा ठिसुळपणा वाढतो .
लक्षणे :-
  •  ऍनिमिया -रक्ताचे प्रमाण कमी होते . 
  • लवकर थकुन जाणे. (Fatique)
  • अशक्तपणा (Weakness)
  • संडास साफ न होणे.(Constipation) 
  • भूक मंदावणे . (Loss of Appetite)
  • मानसिक संतुलन ढासळणे किंवा डिप्रेशन (Depression) चिडचिडेपणा ,उदासपणा,स्मरणशक्ती कमी होणे . 
  • भारतीय महिलांमध्ये खुप जास्त प्रमाण असण्याची कारणे :-
  1. वारंवार उपवास करणे 
  2. खुप जास्त ताणतणाव 
  3. शाकाहारी जेवण 
  4. पुरुषसत्ताक नियमानुसार उशिरा सगळ्यात शेवटी  जेवणे -परिणामी जीवनसत्त्वे नसणारे शिल्लक जेवण त्यांच्या वाट्याला येते . 
दररोज जाणवणारी उदासिनता ,चिडचिडेपणा,अंगदुखी अशक्तपणा याचा सरळ संबंध तुमच्या शरीरातील कमी होणाऱ्या 'ब' जीवनसत्वाशी असू शकतो. 'ब' जीवनसत्व(Vit B12,Vit B6) व फोलेट हे मेंदुतील रसायने(Brain Chemicals) तयार करण्यासाठी आवश्यक असतात . त्याचा सरळ संबंध मेंदुच्या कार्याशी व आपल्या लहरी(Mood) बरोबर असतो . मेगँलोब्लास्टिक ऍनिमिया या आजारात शरीरात पचनसंस्थेद्वारे 'ब' जीवनसत्व शोषून घेऊ शकत नाही. 
ताणतणावामुळे(Stress) झोप लागत नाही,अन्न पचत नाही ,व्यसने लागतात,पित्ताचा त्रास सुरु होतो. पित्त कमी करण्यासाठी वारंवार पित्तनाशके(Antacid) खावी लागतात .पित्तनाशकाच्या अतिवापरामुळे जठरातील PH चे प्रमाण कमी होते, परिनामतः 'ब' जीवनसत्व शोषून घेण्याची जठराची क्षमता कमी होते उदा.वारंवार उपवास करणाऱ्या महिला व सारखे कामाच्या वेळेत बदल व झोपेच्या वेळेत बदल,खाण्यापिण्याच्या वेळेत बदल करावा लागणार कामगार वर्ग . 

घातक हायपर होमोसिस्टेनिमिया:-

शरीरातील होमोसिस्टीनचे प्रमाण  १५ µmol/L(Micromole per Liter)पेक्षा जास्त झाल्यास त्यास हायपर  होमोसिस्टेनिमिया असे म्हणतात . 
 होमोसिस्टीन हा घटक अन्नातून मिळत नाही. तर तो शरीरात तयार होतो. काही जन्मजात आजारात याचे प्रमाण जास्त आढळून येते. 
शरीरात 'ब' जीवनसत्वाची कमतरता झाली की होमोसिस्टीनचे प्रमाण वाढते. 
'ब'जीवनसत्व,फोलिक आम्लाच्या (Folic Acid) मदतीने होमोसिस्टीनचे मेथियोनीन व सिस्टीन मध्ये रूपांतर करून होमोसिस्टीनचे प्रमाण मर्यादित ठेवले जाते.
'ब' जीवनसत्व(Vit B12/Vit B6/फोलेट) कमी झाल्यामुळे व हायपर होमोसिस्टेनिमियामुळे खालील धोके उदभवतात :-
  • हाडांचा ठिसुळपणा (Osteoporosis)
  • हृदयविकाराचा झटका (Heart Attack)
  • लकवा मारणे (Paralysis) 


'ब' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा हाडांचा ठिसुळपणा

'ब' जीवनसत्व डी.एन.ए तयार करण्यासाठी मदत करतो.
शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये हाडांच्या पेशीमध्ये  डी.एन.ए
असतो. 'ब' जीवनसत्व हाडातील कॅलशियम निघून जाण्याच्या
प्रक्रियेस (Osteoclast Activity) आळा घालते. तसेच हाड तयार करणाऱ्या प्रक्रियेस (Osteoblast Activity)चालना देते. तसेच हाडात  कॅलशियम साठवण्याच्या प्रक्रियेस गतिमान करते . परिणामी हाडांची घनता (BMD) वाढते.                                                               
हृदयविकाराचा  झटका व लकवा मारणे 


हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीत अडथळा (Block)निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. तसेच मेंदुला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा (Block)निर्माण झाल्यास लकवा अथवा अर्धांगवायुचा झटका येतो. 

         रक्तवाहिनी आडवा छेद 
रक्तवाहिनी तीन स्तरांनी (लेअर) बनली आहे. 
प्रत्येक स्तराचे कार्य वेगळे आहे.
सर्वात आतील स्तर (तिसरा स्तर):- 
रक्त वाहत असतांना अडथळा (Block) निर्माण होऊ देत नाही.
रक्तातील पेशी ,प्रथिने,कोलेस्ट्रॉल त्यास चिटकत नाही .
या स्तरातील पेशी सतत नायट्रिक ऑक्साईड(NO)वायु तयार करतात . हा वायु रक्तवाहिन्यांना प्रसारण पावण्यास मदत करून रक्तदाबावर(Blood Pressure) नियंत्रण ठेवतो .  
रक्तातील होमोसिस्टीनचे प्रमाण वाढल्यास अतिरिक्त होमोसिस्टीनच ऑक्सिडेशन होऊन हायड्रोजन पेरॉक्साईड (H2O2)  व सुपर ऑक्साईड रॅडीकल(O2-ve) सारखे रक्तवाहिनीस घातक घटक तयार होतात 


हायड्रोजन पेरॉक्साईड (H2O2)  व सुपर ओक्साईड रॅडिकल (O2-ve)रक्तवाहिन्यांच्या आतील स्तर खराब करतात.खाचखळगे तयार करतात .परिणामी त्यात रक्तवाहिनीतील पेशील ,रक्तघटक,प्रथिने,कोलेस्ट्रॉल अडकून अडथळा (Block) तयार होतो. 

हायड्रोजन  पेरॉक्साईड (H2O2) व सुपर ओक्साईड रॅडिकल  (O2-ve) फारच घातक आहेत. त्यांचा नायट्रस ओक्साईडबरोबर संयोग होऊन नायट्रस ओक्साईड वायुचे प्रमाण कमी होते . परिणामी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात . परिणामी रक्तदाब वाढतो. रक्तवाहिनी हृदयाकडे जाणारी असेल तर हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येतो. मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनी असेल तर अर्धांगवायू किंवा लकवा मारतो. 

'ब' जीवनसत्व(Vit B12/Vit B6) व फोलिक आम्ल यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास होमोसिस्टीनचे प्रमाण मर्यादेत राहू शकते. 

काय करावे लागेल :-'ब' जीवनसत्व व होमोसिस्टीनचे प्रमाण समजण्यासाठी रक्तचाचणी करुन घ्या .'ब' जीवनसत्वाचे प्रमाण कमी आढळ्यास व होमोसिस्टीनचे प्रमाण जास्त आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने 'ब' जीवनसत्व(Vit B12/Vit B6) व फॉलिक ऍसिडयुक्त औषधे घ्या .आहारामध्ये 'ब' जीवनसत्व व फोलिक ऍसिडचा वापर करा. 

Vit B12 कशामध्ये आढळते ?
  • जनावरांपासुन येणारे --दुध ,दही,अंडे,मासे,चिकन 
  • शाकाहारी लोकांनी --- Vit B12 युक्त (Fortified)अन्नपदार्थांचा वापर करावा . 
  • उदा --सोयाबीन दूध,इस्ट एक्सट्रॅक्ट,कडधान्य (Vit B12 युक्त) .
Vit B6 असणारे घटक :- 
  • मासे,मटण,बिफ लिव्हर,बटाटा,हिरव्या पालेभाज्या(स्टार्चयुक्त),फळे (केळी,सफरचंद,खरबुज )
  • Vit B6(Fortified) युक्त कडधान्ये 
फोलिक ऍसिड असणारे घटक :- 
  • ब्रोकोली,पालक,सोयाबिन 
  • लहान आकाराचा वाळलेला वाटाणा,कडधान्ये,राजमा,पावटा,चवळी इ. 
  • फोलिक ऍसिडयुक्त(Fortified) पदार्थ 
पण हे विसरु नका :-
कितीही चांगला आहार घेतला तरी स्ट्रेस (ताणतणाव )कमी केल्याशिवाय चिंतामुक्त राहिल्याशिवाय ब जीवनसत्व शरीरात शोषुन घेतले जात नाही. 
चिता आणि चिंता यात एका  टिम्बाचा (.) फरक आहे परंतु अर्थामध्ये खूप अंतर आहे. 
चिंतेचा प्रवास चितेकडे असतो हे ध्यानात घ्या . 
                                                                                                                 डॉ.संजय कामत 

                                                                                                                      अस्थिरोगतज्ञ 

प्रमुख कामत हॉस्पिटल,पुणे. 
९८२२४३७८८२/७२७६७२२२२९








      



Comments